रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता

कांदा

यावर्षी रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. रब्बी कांदा क्षेत्रात १८ टक्के, तर उत्पादनात २० टक्के वाढीचे अनुमान असून, फेब्रुवारीत निर्यात खुली न झाल्यास अतिरिक्त उत्पादन डोकेदुखी ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील रब्बी कांद्याचे उत्पादन १८९ लाख टनापर्यंत वाढणार असल्याचे केंद्रीय फलोत्पादन विभागातर्फे सांगण्यात येत आहे. यामुळे कांद्याचा मोठा अतिरिक्त साठा निर्माण होण्याची शक्यता आहे.

शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल

वेळीच निर्यातबंदी मागे न घेतल्यास मार्च ते आॅक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. फलोत्पादन अनुमानात १९-२० हंगाम वर्षांत एकूण कांदा उत्पादन २४४ लाख टन अनुमानित आहे. त्यात खरीप आणि लेट खरीप मिळून ५५ लाख टन, तर रब्बीतून १८९ लाख टन अशी वर्गवारी आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात तसेच राज्यातील कांदा बाजारपेठेत आवक लक्षणीय होत आहे.

टॅटू काढताना अनेक गोष्टींची घ्या काळजी, योग्य काळजी घेतली नाही तर…..

आजघडीला बाजारात लेट खरीप कांद्याची आवक होत आहे. यंदा लेट खरिपाचे  उत्पादन कमी असल्याने सध्याचे बाजारभाव फेब्रुवारी २०१९ तुलनेत किफायतीशीर आहेत. लेट खरिपाचा कांदा मार्चच्या मध्यापर्यंत बाजारात सुरू असतो.मागील वर्षी हंगामात १८-१९ मध्ये रब्बी कांद्याखाली ७.६ लाख हेक्टर क्षेत्र होते, त्या तुलनेत हंगाम १९-२० मध्ये उच्चांकी नऊ लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र वाढण्याचे अनुमान आहे. भारतात दरमहा दोन ते तीन लाख टनापर्यंत कांदा निर्यात क्षमता विकसित झाली आहे.