कांद्याला मिळाला १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव

पाऊस व इतर अनेक कारणांनी अन्य राज्यांमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत उन्हाळ कांद्याची मागणी वाढली आहे. परिणामी, या हंगामात प्रथमच बाजार समितीत कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळाला आहे.त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता उत्पादन खर्च सुटण्याइतपत तरी भाव मिळेल, अशी आशा वाढली आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच उन्हाळ कांद्याचे भाव अक्षरश गडगडले होते. कांदा बाजारात दाखल झाल्यापासून मातीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱयांवर आली. मागील महिन्यातही सरासरी भाव ३५० ते ४०० रुपये असा होता. यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आठ दिवसांपासून भावात हळूहळू सुधारणा होताना दिसतेय. दक्षिणेकडील राज्यांमधील कांदा लागवडीखालील क्षेत्र घटले आहे.गुजरात व इतर राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याने टंचाई निर्माण झाली आहे. मध्यप्रदेश सरकारने कांदा खरेदी करून लगेचच त्याची विक्री केल्याने तेथील स्थानिक बाजारातही तुटवडा जाणवतोय. या सर्व कारणांमुळे कांद्याची मागणी वाढली आहे. जूनच्या तुलनेत सरासरी भावात क्विंटलमागे सहाशे रुपयांची, कमाल भावात हजार रुपयांची वाढ झाली आहे. पुणे बाजार समितीत कांद्याला या हंगामातील उच्चांकी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.असून अजून हि भाव वाढतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे तर शेतकऱ्याला कर्जमाफी नको शेतमालाला हमीभाव द्या म्हणजे शेतकरी आत्महत्या करणार नसल्याचं शेतकरी सांगतात
आठ दिवसांपासून कांद्याच्या भावात हळूहळू सुधारणा होत आहे . परराज्यातील कांदा लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. मध्यप्रदेश सरकारने कांदा खरेदी करून लगेचच त्याची विक्री केल्याने तेथील स्थानिक बाजारातही तुटवडा जाणवतोय. या सर्व कारणांमुळे कांद्याची मागणी वाढली आहे.शेतकऱ्याला कर्ज माफी नको पण हमीभाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहें बाजार भाव वाढल्याने शेतकरी आनंदी झाले असून अजून हि कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे