औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये १४ टक्‍केच कर्जपुरवठा

जानेवारीच्या मध्यापर्यंत औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत १४ टक्‍केच कर्जपुरवठा केल्याची स्थिती आहे. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांना १५६९ कोटी १ लाख २४ हजार रुपये कर्जपुरवठ्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. त्या तुलनेत जानेवारी मध्यान्हापर्यंत चारही जिल्ह्यांत केवळ १४.०५ टक्‍के अर्थात २२० कोटी ४२ लाख रुपयांचा तोही २४ हजार ४२६ शेतकरी सभासदांनाच कर्जपुरवठा करण्यात आला.

राज्यातील सरपंचांच्या मानधनात लवकरच भरीव वाढ होणार

औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बीसाठी ५२७ कोटी ९९ लाख रुपयांच्या कर्जपुरवठ्याचा लक्ष्यांक असताना केवळ ५९५८ सभासदांना ५२ कोटी ७४ लाख ७० हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला.जालना जिल्ह्यात कर्जपुवठ्याचा ४५३ कोटी ७ लाख रुपयांचा लक्ष्यांक आहे. मात्र ९७४३ सभासदांना १०३ कोटी ७६ लाख ६८ हजार रुपये कर्ज पुरविण्यात आले.

बळीराज्यामुळेच आपण जगतो त्याला अशी भिक नका देऊ – रुपाली चाकणकर

परभणी जिल्ह्यात ३१३ कोटी ४६ लाख ८६ हजार रुपये लक्ष्यांकाच्या तुलनेत ७७३४ शेतकऱ्यांना ५४ कोटी ६८ लाख १६ हजार रुपये कर्जपुरवठा केला गेला. हिंगोली जिल्ह्यात यंदा २७४ कोटी ४८ लाख ३८ हजार रुपये कर्जपुरवठ्याचा लक्ष्यांक आहे. मात्र केवळ ९९१ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ७४ हजार रुपयांचा अर्थात लक्ष्यांकाच्या केवळ ३.३६ टक्‍केच कर्जपुरवठा करण्यात आला.