नवी दिल्ली – प्रधानमंत्री किसान ( PM Kisan) योजनेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीची आहे कि पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.
प्रधानमंत्री किसान ( PM Kisan) योजनेचे आत्तापर्यंत १० हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून दर ४ महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. त्यामुळे या योजनेतून आत्तापर्यंत पात्र शेतकर्यांना सुमारे 20 हजार रुपयांची मदत केली गेली असल्याचे समजत आहे.
पीएम किसान सम्मान निधि योजणेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, तर आता चांगली बातमी आहे कि पीएम किसान सम्मान निधि योजनेचा ११ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देशातील 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये मिळणार असल्याने या योजनेचे पात्र शेतकरी मोठे आनंदी असल्याचे यावेळी बघायला मिळाले.
ई-केवायसी कशी करणार? जाऊन घ्या
पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी पूर्ण केली नसेल, तर आपण घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने किसान ॲप द्वारे केवायसी करू शकता. नाहीत आपण आपल्या जवळच्या सेवा केंद्रावर भेट देऊन ई-केवायसी करू शकता. केवायसी करण्यासाठी मोबाईल नंबर तसेच आपले बँक अकाउंट आधारशी लिंक असणे अनिवार्य असते.
महत्वाच्या बातम्या –
- ऊस गाळपासह साखर उत्पादनात ‘हा’ जिल्हा राज्यात आघाडीवर
- ‘पोकरा’ अंतर्गत ६५ हजार शेतकऱ्यांना लाभ; डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा
- मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. 2 फेब्रुवारी २०२२
- महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
- राज्यातील ‘या’ गावात पिकतो विदेशी काळा ऊस
- बांधकाम कामगारांसाठी मध्यान्य भोजन योजना मदतनीस – बच्चू कडू
- राज्यातील साखर उत्पादनात वाढ; आतापर्यंत ७२९.०२ लाख टन साखर उत्पादन