शेतक-यांच्या वाट्याला केवळ पाच हजार कोटी येतील हे म्हणजे कोपराला गूळ लावायचा आणि हातानं चाटायचा – सदाभाऊ खोत

सातारा – कोरोच्या संकटात शेतकरी उध्वस्त झाला आहे. यंदा दिवाळी ही शेतक-यांची कडू झाली आहे. सरकारने दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यामधून ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपूरवठा विभाग या सर्वांना निधई विभागून दिला आहे. शेतक-यांच्या वाट्याला केवळ पाच हजार कोटी येतील हे म्हणजे कोपराला गूळ लावायचा आणि हातानं चाटायचा अशीच राज्य सरकारची शेतक-यांना मदत आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी क-हाड येथे नुकतीच केली.

ते म्हणाले, राज्यसरकारकडून देण्यात येणारी मदत ही शेतक-यांवर अन्याय करणारी आहे. फळलागवड असणा-या शेतक-यांला प्रतिहेक्टरी एक लाख रुपये देणे आवश्यक आहे. बागायत उत्पादक शेतक-यांना 50 हजार तर कोरडवाहूसाठी 25 हजार रुपये देणे आवश्यक आहे.

दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे घोषणा नको तर लवकर मदत देवून राज्यसरकारने मेहरबानी करावी असेही खोत यांनी नमूद केले. दरम्यान सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती राज्य सरकारच्या वर्मावर बोट ठेवून बोलत असेल तर त्यांच तोंड बंद करण्यासाठी जून प्रकरण उकरुन काढून अटक केली जात आहे. राज्यामध्ये अशी कितीतरी प्रकरण आहेत. ज्यांच्या चौकशी वर्षानुवर्षा चाललेल्या आहेत परंतु त्यावर ठोस कारवाई होत नाही असेही खोत यांनी नमूद केले.

महत्वाच्या बातम्या –