Oppo F15 चा सेल सुरु , अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट फोन खरेदीसाठी उपलब्ध

Oppo F15 चा सेल सुरु , अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट फोन खरेदीसाठी उपलब्ध oppo f15

‘ओप्पो’ने नुकताच आपला नवा स्मार्टफोन Oppo F15 लाँच केला असून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही संकेतस्थळांवर हा फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये VOOC 3.0 फ्लॅश चार्ज सपॉर्टसह 4,000 mAh क्षमतेची बॅटरी असून केवळ पाच मिनिटे चार्ज केल्यानंतर हा फोन दोन तासांचा टॉकटाइम बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे.

व्होडाफोनच्या ग्राहकांना धक्का

19 हजार 990 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत असून यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये स्लीक डिझाइन असून 6.4 इंचाची फुल HD+ AMOLED स्क्रीन आहे. गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन असलेल्या Oppo F15 च्या मागील बाजूला क्वॉड-कॅमेरा सेटअप आहे. म्हणजेच मागील बाजूला चार कॅमेरे असून यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल क्षमतेचा असून अन्य कॅमेरे 8, 2 आणि 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात प्रोफेशनल मोड, पॅनोरमा, पोर्ट्रेट, नाइट सीन, टाइम-लॅप्स फोटोग्राफी, स्लो मोशन यांसारखे मोड आहेत.

भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही – राजू शेट्टी

फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असून हा स्मार्टफोन 0.32 सेकंदात अनलॉक होतो असंही कंपनीने म्हटलंय. ओप्पोचा हा स्मार्टफोन लाइटनिंग ब्लॅक आणि युनिकॉर्न व्हाइट कलरमध्ये मिळेल. हा स्मार्टफोन Android Pie V9.0 वर आधारीत Color OS 6.1 वर कार्यरत असेल. वजन 172 ग्रॅम असलेल्या या फोनमध्ये 3 कार्ड स्लॉट दिलेत.