मुंबईचं दुध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का ? चंद्रकांत पाटलांचा शेतकरी आंदोलनाला विरोध

टीम महाराष्ट्र देशा : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या नावावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलैपासून दूध संकलन बंद करण्याबरोबरच मुंबईला जाणारे सर्व दूध रोखण्याचा इशारा दिला आहे. मात्र आता या आंदोलनाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. मुंबईचं दुध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का ? असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टीनी पुकारलेल्या आंदोलनाला विरोध केला आहे.

तर, शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी करणे हि आंदोलनाची कोणती पद्धत आहे. तुम्हाला आंदोलन करायचे आहेत तर धरणे धरा , बसून रहा पण कोणी कायदा हातात घ्याल तर कायद्याने कारवाई होईल असा इशारा सुद्धा चंद्रकांत पाटलांनी राजू शेट्टींना दिला आहे.

सायबी टोपी घाला, हॅट घाला अथवा काहीही घाला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा- राजू शेट्टी

मी सरकारचा संकटमोचक ; चंद्रकांतदादांनी थोपटून घेतली स्वतःची पाठ