भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाला तातडीने रक्कम अदा करण्याचे आदेश

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली भंडारा दूधभुकटी प्रकल्पासंदर्भात बैठक

कोरोना संकटकाळातील लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या दूधभुकटी प्रकल्पासाठी दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मोबदला रक्कम अदा करावी. या संदर्भात एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस रक्कम थकीत राहता कामा नये यादृष्टीने सर्व स्तरावर दक्षता घेण्यात यावी, असे आदेश पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री आणि भंडारा जिल्हा पालकमंत्री सुनील केदार यांनी संबंधितांना दिले.

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती द्या – नाना पटोले

विधानभवन येथे आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली दूधभुकटी प्रकल्पासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री.केदार यांनी महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकांना त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले.

‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या’- देवेंद्र फडणवीस

शेतीमाल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पुढाकाराने नाना पटोले आणि सुनील केदार यांच्या प्रयत्नातून हा दूधभुकटी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र पुरवठा केलेल्या दुधाचा मोबदला शेतकऱ्यांना तातडीने प्राप्त होणे आवश्यक असल्याने आवश्यक उपाय योजण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. दूध उत्पादकांच्या हितासाठीचा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने अविरत सुरु रहावा. दूध उत्पादकांना तातडीने मोबदला मिळावा. तयार झालेली दूध पावडर व अन्य उत्पादन यांची उचित वाहतूक व्यवस्था व्हावी, यादृष्टीने या बैठकीत निर्णय घेण्यात आले.

प्रकल्पग्रस्त शेतकरी कै.धर्मा पाटील प्रकरणी अधिक मदत देण्याबाबत शासन सकारात्मक

या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, महानंदचे व्यवस्थापकीय संचालक नरेश गिते यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करावे – विधानसभा अध्यक्ष

धान खरेदीचे धोरण ठरविण्यासाठी विधीमंडळात चर्चा करणार – नाना पटोले