‘या’ जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव

अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव

नगर – ज्वारी (इंग्रजी Sorghum bicolour) हे एक तृणधान्य आहे. ज्वारीला जोंधळा असेही म्हणतात. या वनस्पतीला इंग्रजीत Great milletअसे म्हणतात. याचा उगम आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात झाला असे मानतात. एका मतानुसार ज्वारी इस पूर्व ११ व्या शतकात आफ्रिकेतून भारतात आली असे मानले जाते. भारतात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पिक घेतले जाते.

तसेच ज्वारी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. तिचे आपल्याला अनेक फायदे होतात. आपल्याकडे काही पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो. ज्यामुळे ते पीक चांगले येत नाही. त्याचप्रमाणे आता अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी माक्यासोबतच ज्वारीवरही अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. या अळीच्या निर्मूलनाबाबत उपाययोजना करायला हव्यात पण नगर जिल्ह्यात या लष्करी अळीच्या निर्मूलनाबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.

तसेच या अळीने शेवगाव, पाथर्डीसह अन्य काही भागांत साधारण तीस ते चाळीस टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. या आधीच लांबलेल्या पावसाळ्याने रब्बीत ज्वारीच्या क्षेत्रात पन्नास टक्के घट झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त नगर जिल्ह्यात रब्बी क्षेत्र असते. यावर्षीही चांगल्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झाली आहे. मात्र पेरणी झालेल्या ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे.

श्रीगोंदा तालुक्यात मागील दीड महिन्यांपूर्वी ज्वारीवर एका ठिकाणी लष्करी आळी आढळून आली होती. जर त्याचवेळी तातडीने तालुका कृषी कार्यालयाने उपाययोजना सुचवल्या व जनजागृती केली असती तर या आळीवर नियंत्रण मिळवता आले असते.

अहमदनगर जिल्ह्याला जोडून असलेले सोलापूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली यांच्यासोबतच विदर्भातील काही भागात ज्वारीचे पीक घेतले जाते. परंतु या भागातही ज्वारीवर आळी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –