साखर कारखान्यातून आता मिळणार ऑक्सिजन; राज्यातील ‘या’ साखर कारखान्याने केली ऑक्सिजन निर्मिती

साखर

उस्मानाबाद – महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागत आहे. केंद्र सरकार राज्याला ऑक्सिजन पुरवठा करत आहे. मात्र, राज्याला अधिक ऑक्सिजनची गरज आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पवारांच्या आवाहनाला आता प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. साखर कारखान्यामधील इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यात सुरु करण्यात आला आहे. आज हा प्रकल्प यशस्वी झाला असून साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिलाच कारखाना ठरला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या खाजगी साखर कारखान्यामध्ये रोज नव्वद ते शंभर जम्बो सिलेंडर भरतील एवढा ऑक्सिजन उत्पादित होऊ लागला आहे. येत्या काही दिवसात हे प्रमाण 600 सिलेंडरपर्यंत जाईल. फक्त 60 कोटी रुपये गुंतवणूक करून यंत्रणा उभारण्यात आली आहे. यासाठी पुर्वीचीच यंत्रणा वापरून हा प्रयोग करायचे ठरले. कारखान्याने आणखी एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मती होऊ शकते यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. मात्र, हा प्रयोग आता यशस्वी झाला असून मौज इंजिनीयरिंगच्या धीरेंद्र ओक यांनी संपूर्ण भारतीय बनावटीच्या ऑक्सिजन प्लॅंट तयार केला आहे. यात परदेशी बनावटीचा कॉन्सन्ट्रेटर आणि जर्मनीमधून मॉलिक्युल आणावे लागले.

महत्वाच्या बातम्या –