पंकजा मुंडेंनी चार वर्षांच्या टीएचआरच्या टेंडर पोषण आहारमध्ये हजार पंधराशे कोटी कमावले – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

चार वर्षांच्या टीएचआरच्या टेंडर पोषण आहारमध्ये हजार पंधराशे कोटी कमावले. साधेसुधे नाही हजार पंधराशे मग शेतकऱ्यांच्या उसाचे पैशे कां ठेवता.. असा गंभीर आरोप धनंजय मुंडें यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे. परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात धनंजय मुंडे बोलत होते.

वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे थकीत बिलाचे पैशे एफआरपीसह तत्काळ द्या, अन्यथा शासनाने संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी धनंजय मुंडें यांनी केली.

पैशे आजच्या आजएफआरपीप्रमाणे द्यावेत, कायद्याने संचालक मंडळावर कारवाई करावी. अशी मागणी केली. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या घणाघाती आरोपावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

महत्वाच्या बातम्या –

शेतकरी कर्जमाफी योजना राबवूनही पीककर्ज वाटपाचे प्रमाण ७० टक्क्यांवरून ४५.५० टक्क्यांवर – धनंजय मुंडे

कोरडा दुष्काळ घोषित करण्यासाठी दररोज निवेदनांचा पाऊस

शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या ; नवनीत राणांची मागणी