Papaya Seed Benefits : पपईच्या बिया आरोग्यास फायदेशीर ; जाणून घ्या फायदे

Papaya Seed Benefits : पपईच्या बिया आरोग्यास फायदेशीर ; जाणून घ्या फायदे papaya

Papaya | पपई –  पपई वर्षभर सहजतेने बाजारात उपलब्ध होते. बर्‍याचदा लोक पपई खाल्यानंतर त्याचे बिया फेकून देतात. पपईची बिया या आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी चांगल्या असतात. पपईच्या बिया वाळवून आणि सुकवून खाल्ला जाऊ शकते. पपई मध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन, पॅपेन एन्झाईम आणि मॅग्नेशियम असते. पपईमध्ये व्हिटामिन ‘ए’ चे प्रमाण अधिक असते. पपई व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. त्यामुळे पपईमध्ये इतर फळांपेक्षा अधिक औषधी गुणधर्म असतात.  पपईच्या बिया नियमित खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. बिया असलेली आणि बिया नसलेली दोन्ही पपई बाजारात उपलब्ध आहेत, परंतु ज्या पपईच्या आत बिया असतात, ती अधिक फायदेशीर मानली जाते.

 Papaya Benefits –

१. पचन (Digestion) – पचनाची समस्या असेल तर पपईच्या बिया खाल्ल्याने  ( papaya seeds ) ती कमी होऊ शकते आणि पचन सुधारण्यास बिया मदत करतात.

२. लिव्हर (Liver) – पपईच्या बिया आपल्या लिव्हरसाठी देखील खूप फायदेशीर आहेत.

३. मूत्रपिंड (Kidney) – पपईच्या बियाने मूत्रपिंडे निरोगी राहण्यास मदत होते. मूत्रपिंडे निरोगी ठेवण्यासाठी पपईच्या 7 बिया दिवसातून 7 वेळा घेण्याचा सल्ला दिला जातो. त्या चघळूनही खाता येतात.

४. वजन –  पपईच्या बिया शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. पपईच्या बियात जास्त प्रमाणात फायबर असल्याने वजन कमी होते. तसेच वारंवार भूक लागत नाही.

५. डेंग्यू ताप – पपईच्या बिया खाल्ल्यानं डेंग्यूच्या तापा कमी होतो. डेंग्यू झाल्यावर पपईच्या बिया खाल्ल्या तर त्याच्या रक्तपेशींची वाढ होते.

६. त्वचा-  त्वचेसाठी पपईच्या बिया अतिशय चांगल्या आहेत. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत मिळते तसेच डेड स्कीन कमी करण्याचे काम पपई करते. पपईच्या बियांचा वापर फेसवॉश सारखा केला जाऊ शकतो. त्यामुळे चेहरा उजळतो आणि त्वचेवर झालेले इन्फेक्शन सुद्धा दूर होतात. पपईच्या बियांचा पेस्ट बनवून तुमच्या चेहऱ्यावर लावावे.

७. इन्फेक्शन – पपईच्या बिया इन्फेक्शन, शरीर भागात जळजळ, सूज यापासून आराम देण्यास मदत करते.

How to Eat Papaya 

पपईच्या बिया वाटून, रस करून खाता येतात. पपईच्या बिया चावून खाणे टाळावे.  5-6 सुकलेल्या बिया बारीक करुन ज्यूस, मध, गुळ किंवा सलादमध्ये देखील खाऊ शकता. 

(टीप- पपईच्या बिया खाण्यापूर्वी डॉक्टरांशी बोलले पाहिजे. लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या समस्यांवर प्रभावी ठरेल.) ( Papaya Nutrition )