बीज प्रमाणीकरणासाठी परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ५ हजार हेक्टर क्षेत्राची नोंदणी

बीज प्रमाणीकरणासाठी परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील ५ हजार हेक्टर क्षेत्राची नोंदणी vj

विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी कार्यालयांतर्गत परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील ३ हजार ८६ बीजोत्पादक शेतकऱ्यांनी ५ हजार १५६.९० हेक्टर क्षेत्राची बीज प्रमाणीकरणासाठी नोंदणी करण्यात अली आहे. यंदाच्या रब्बी हंगामात सूर्यफूल, जवस,ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांचा पायाभूत तसेच प्रमाणित बियाण्यांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगतिले जात आहे.

अर्थसंकल्प : कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ६,४१० कोटी रुपयांची तरतूद

यावर्षी लातूर जिल्ह्यातील ज्वारी, गहू, हरभरा,सूर्यफूल, करडई, जवस या पिकांची बीज प्रमाणीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. तर परभणी नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील ज्वारी, गहू, हरभरा, करडई या पिकांची बीज प्रमाणीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे.  प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत २ हजार ८६८ शेतकऱ्यांनी ४ हजार ७९८.३० हेक्टर क्षेत्राची नोंदणी केली आहे, असे विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी सांगितले.