पारनेर तालुक्याला अठरा कोटींचा पिक विमा- उदय शेळके

पारनेर: प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगामातील पिक विमा नुकसान भरपाईमध्ये पारनेर तालुक्यातील ११ हज़ार ११८ शेतकर्यांना लाभ झाला असून या शेतकर्यांना तब्बल १७ कोटी ९५ लाख २४ हजार ११३ रुपयांचा पिक विमा मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ऍड. उदय शेळके यांनी दिली.

सन २०१६-१७ या वर्षात रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी जिल्हा बँक स्तरावर पिक विम्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आला होता. जिल्हा बँकेच्या शाखा निहाय मंजूर झालेल्या पिक विम्याच्या रकमेची आकडेवारी पारनेर- २ कोटी ३६ लाख ६४ हजार, सुपा- ३६ लाख ७२ हजार, नारायणगव्हाण- १५ लाख ६६ हजार, रांजणगाव- ६ लाख ५८ हजार, जामगाव- १ कोटी ५८ लाख ८२ हजार, भाळवणी- १ कोटी ३५ लाख ७० हजार, कान्हूर पठार- १ कोटी १५ लाख ४७ हजार, टाकळी ढोकेश्वर- १ कोटी २० लाख ६२ हजार, अळकुटी- ५ लाख ६८ हजार, निघोज- २ लाख ५८ हजार, वडझिरे- ४ लाख ७० हजार, जवळा- ४२ लाख १२ हजार, कर्जुलेहर्या- १ कोटी ४० लाख ६१ हजार, पळवे-खु- २८ लाख ३९ हजार, वाळवणे- ६३ लाख ९५ हजार, पिंपळगाव रोठा- १ कोटी १९ लाख ८६ हजार, ढवळपुरी- १ कोटी ५७ लाख ३५ हजार, खडकवाडी- ३८ लाख ९ हजार, मांडवे- २ लाख ३८ हजार, वाडेगव्हाण- ४ लाख ७२ हजार, म्हस्केवाडी- ४ लाख ९६ हजार, राळेगण थेरपाळ- ५ लाख ४९ हजार, गोरेगाव- १ कोटी २७ लाख ७२ हजार, पारनेर टाऊन- २ कोटी २० लाख ३० हजार.

ज्वारी, कांदा व करडई या पिकांसाठी तालुक्यातील ११ हजार ११८ सभासद शेतकर्यांना हा पिक विमा मंजूर झाला असून या विम्याचे वाटप लवकरच शेतकर्यांना केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक ऍड. उदय गुलाबराव शेळके यांनी दिली.