सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्त्वाचा – जयंत पाटील

जयंत पाटील

पुणे – सिंचन (Irrigation) व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असून राज्यातील पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. जलसंपदा विभागाच्यावतीने दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

बालगंधर्व रंगमंदीर येथे जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन व अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव विलास राजपूत, पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह.वि. गुणाले उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील म्हणाले, पाणी वापर संस्थाचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासोबतच पाणी वापर संस्था सक्षम होण्यासाठी जलसंपदा विभागाने सुरू केलेली महात्मा फुले पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. राज्यात पाणी वापर संस्थाच्या माध्यमातून पाण्याची सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. गावशिवारातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणांसोबत पाणी वापर संस्थाचाही सहभाग आवश्यक आहे. पाणी वापर संस्थानी गावशिवारात पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

सिंचन (Irrigation) क्षेत्रात वाढ होण्यासाठी जलसंपदा विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले, सिंचन क्षेत्रात लोकसहभाग वाढावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने पाणी वापर संस्था व जलसंपदा विभागातील अधिकारी यांचा समन्वय महत्वाचा आहे. पाण्याचा कार्यक्षमतेने वापर होण्यासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग गरजेचा आहे.  जलसंपदा विभागाच्यावतीने प्रोत्साहन म्हणून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी कार्य करणाऱ्या संस्था व गुणवंत अभियंत्याचा पुरस्काराने गौरव करण्यात येतो, यापुढे दरवर्षी 15 सप्टेंबरला पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात येईल.

जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम म्हणाले, सिंचन क्षेत्रात पाणी वापर संस्था व अभियंता यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंचन क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव होण्यासोबतच इतरांना प्रेरणा मिळावी यासाठीच ही पुरस्कार योजना आहे. पाणी वापर संस्थांनी सक्षम होण्यासोबतच पाण्याच्या काटेकारे नियोजनात अधिकाधिक सहभाग वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पाणी वापर संस्था व अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला यावेळी जलसंपदा विभागाच्या सर्व खोऱ्यांचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, अधिकारी पाणीवापर संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार

सन 2014-15 राज्यस्तरीय पुरस्कार

प्रथम – कृषी देवता कालवा पाणी वापर संस्था, गुनवडी ता. बारामती, जि. पुणे.

द्वितीय – संत कदम माऊली पाणी वापर संस्था, पाथरे ता. राहुरी जि. अहमदनगर.

तृतीय – बागाईतदार पाणी वापर संस्था आराई, ता. बागलाण जि. नाशिक

सन 2014-15 विभाग नाशिक

प्रथम – जय बजरंग पाणी वापर संस्था, जानोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

द्वितीय- श्री. समर्थ पाणी वापर संस्था, मोहाडी ता. दिंडोरी जि. नाशिक

सन 2014-15 विभाग पुणे

प्रथम- श्री. गुरुनाथ पाणी वापर संस्था क्र. 37 वडनेर खुर्द, जांबूत ता. शिरुर जि. पुणे

द्वितीय- श्री. खांडेश्वरी पाणी वापर संस्था मर्यादित खांडज, ता. बारामती, जि. पुणे

सन 2014-15 विभाग अमरावती

प्रथम – अंब्राजी बाबा पाणी वापर संस्था, परसापूर ता. अचलपूर, जि. अमरावती

द्वितीय – जय किसान पाणी  वापर संस्था परसापूर ता. अचलपूर, जि. अमरावती

सन 2014-15 विभाग नागपूर

प्रथम- गजानन पाणी वापर संस्था, बोंडगाव/तुट, ता. अर्जुनी, जि. गोंदिया

द्वितीय – माँ गंगा पाणी वापर संस्था, अरततोंडी अरुणनगर, ता. अर्जुनी, जि. गोंदिया

सन 2014-15 विभाग औरंगाबाद

प्रथम – जलस्वराज्य पाणी वापर संस्था, बारड, ता.मुदखेड, जि. नांदेड

द्वितीय – मुक्तागिरी  पाणी वापर संस्था, देळुब, ता. अर्धापूर जि. नांदेड

सन 2014-15 विभाग कोकण

प्रथम – गंगेश्वर पाणी वापर संस्था, शिरगाव ता. देवगड, जि. सिधुदुर्ग

द्वितीय – लिंगेश्वर पावणादेवी  पाणी वापर संस्था, निळेली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

सन 2017-18 करिता मोठे प्रकल्प राज्यस्तरीय पुरस्कार

प्रथम – जानुबाई पाणी वापर संस्था, शिरवली, ता. बारामती जि. पुणे

द्वितीय – ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्था, ता. बारामती जि. पुणे

तृतीय – वारेगाव ग्रुप उपसा जलसिंचन सहकारी  पाणी वापर संस्था, ता. सिन्नर , जि. नाशिक

सन 2017-18 कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पुरस्कार

प्रथम – पेनटाकळी प्रकल्प पाणी वापर संस्था, संघ मेहकर, जि. बुलढाणा

सन 2018-19 करिता मोठे प्रकल्प पुरस्कार

प्रथम – केशवराज पाणी वापर संस्था, अन्वी मिर्झापूर जि. अकोला.

सन 2018-19 करिता मध्यम प्रकल्प

प्रथम – कै. रंगनाथ गोपाळपाटील पाणी वापर संस्था, वलखेड, ता. दिंडोरी जि. नाशिक

जलसंपदा विभाग अभियंता गौरव पुरस्कार

अधिक्षक अभियंता र. रा शुक्ला, कार्यकारी अभियंता राजेश मोरे, उपसचिव ज्ञा. आ. बागडे, कार्यकारी अधिकारी श्रीराम हजारे, सहायक अभियंता योगेश सावंत, शाखा अभियंता बबन राठोड, शाखा अभियंता श्रीरंग ठवरे, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीचे दिलीप जोशी, कार्यकारी अभियंता जयंत खाडे, उपविभागीय अभियंता दिपीका भागवत, सहायक अभियंता गिरीश अपराजित, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे विलास पाटील, सहायक अभियंता गजानन घुगल, अधिक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, कार्यकारी अभियंता प्रविण कोल्हे, उपविभागीय अधिकारी प्रशांत आडे, महेंद्र जोशी उपविभागीय अधिकारी, शाखा अभियंता जयसिंग हिरे, शाखा अभियंता कैताण बार्देस्कर, शाखा अभियंता राजकुमार पवार यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच सन 2016-17 मध्ये वाशिम जिल्हा सिंचन प्रकल्पाबाबत उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत अधीक्षक अभियंता प्रमोद मांदाडे व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

राज्य तांत्रिक सल्लागार समिती-1 चे महासंचालक श्री. रा.वा. पानसे व त्यांचे सहकारी अधिकारी  व राज्य तांत्रिक सल्लागार समिती -2 मध्ये मुख्य अभियंता राजेंद्र पवार व त्यांचे सहकारी अधिकारी यांचा सांघिक गौरव करण्यात आला. तसेच गोसखुर्द प्रकल्पासाठी सांघिक पुरस्कार मुख्य अभियंता अरुण कांबळे व त्यांच्या सहकारी अधिकारी यांचाही गौरव करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –