रुग्ण बरा होण्याचा दर सातत्याने ५५ टक्क्यांवर – राजेश टोपे

राजेश टोपे

कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येने ओलांडला दीड लाखाचा टप्पा – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि.१५ : राज्यात आज ३६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५२  हजार ६१३  झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  ७९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख  ११ हजार ८०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ८ हजार ९०१ नमुन्यांपैकी २ लाख ७५ हजार ६४० नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ८ हजार ३७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ३१५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बेरोजगार लोकांना साखर उद्योगांमध्ये रोजगाराची संधी

राज्यभरात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्णांना घरी सोडले – राजेश टोपे