VIDEO- किल्ले शिवनेरी ते लाल किल्ल्यावर धडकणार शेतकऱ्यांचा मोर्चा

पुणे: अखिल भारतीय शेतकरी मराठा महासंघाच्या वतीने आता थेट दिल्लीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा १ मे २०१८ पासून महाराष्ट्रातून किल्ले शिवनेरी ते लाल किल्यावर धडकणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागान्यांसाठी शेतकरी आता राजधानीत धडकणार आहेत. देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, डॉ. स्वामिनाथन आयोग लागू करावा इत्यादी मागण्यांसाठी संभाजीराजे दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शेतकरी एकटवणार असून  देश पातळीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार आहेत.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या ?
१. देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
२. डॉ. स्वामिनाथन आयोग लागू करावा
३. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा
४. शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे
५. शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा