शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडला ; बच्चू कडू

bachhu kadu

“पीकविम्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेल्या कामकाजाच्या समितीचा प्रमुख म्हणून त्या बाबतची सर्व सूत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली गेली आहे. मुळात जिल्हाधिकारी १०० समित्यांचे अध्यक्ष असून, त्यांना या किचकट समस्येत लक्ष घालण्यासाठी वेळ नाही. सर्व फाइल कृषी विभागाचेच अधिकारी तयार करून ठेवतात. या समितीत जिल्हाधिकारी नव्हे तर स्थानिक आमदारांचा समावेश करायला हवा. शेतकऱ्यांच्या समस्या, व्यथा आणि गावपातळीवरचा कारभार आम्हाला पटकन लक्षात येतो,” असा मुद्दा आमदार बच्चू कडू यांनी मांडला.

राज्यात शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडला आहे. कंपन्यांना नफा मिळवून देण्यासाठी अधिकारी ‘मॅनेज’ केले जात आहेत, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. ही योजना मुळात कृषी विभाग राबवीत आहे, असे आमदार कडू यांनी स्पष्ट केले. सध्या पीकविम्याच्या नावाखाली राज्यभर गोंधळ सुरू आहे. कंपन्यांची कार्यालये नाहीत, त्यांचा माणूस कोण आहे हे समजत नाही आणि तो शेतकऱ्यांना भेटतही नाही असा आरोप आमदार कडू यांनी केला.

शेतकऱ्यांनो काठीण परिस्थितीत मनामध्ये आत्महत्येची भावना आणू नका ; कृषीमंत्री

राज्यातील १९ लाख शेतकरी झाले उन्नत व समृद्ध…