रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात शेतकऱ्यांचा मातोश्री बंगल्यापर्यंत मोर्चा

रायगड जिल्ह्यातील शेतकरी विष्णु पाटील यांच्या नेतृत्वाखाल रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पाविरोधात लढा देत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले नसल्याने त्यांनी आता विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली  4 फेब्रुवारी 2020 रोजी प्रांत कार्यालयापासून ते मातोश्री बंगल्यापर्यंत पायी अर्धनग्न मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट कंपनीने अगदी अल्पदरात शेतजमिनीचा मोबदला देऊन दडपशाहीने जमिनी संपादित केल्याने आमची सर्व शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचा आरोप आज पत्रकार परिषद घेऊन विष्णू पाटील आणि शेतकऱ्यांनी केला.

राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पूरग्रस्तांसाठी दिले एक महिन्याचे वेतन

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायन्सचे अधिकारी हितेन रॉय यांनी लेखी हमीपत्र देऊनसुद्धा कबुल केलेला मोबदला दिला नाही. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी वेगवेगळा मोबदला दिला गेलेला आहे. तर जवळपास 148 शेतकऱ्यांपैकी 80 टक्के शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता त्यांच्या शेतामध्ये कंपनीने जबरदस्ती काम करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. याबाबत तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत किंवा चर्चा करण्याबाबत उदासीनता दाखविली असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी यावेळी केला.

पीकविमा फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांनी घेतली बच्चू कडू यांची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक हितावह निर्णय ते घेत असल्याने शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख होत चाललले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पेण आणि खालापूर येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.