जनमत सरकार विरोधात जात आहे त्यामुळे कामाला लागा :पवार

वेब टीम :सध्या देशातील जनमत सरकार विरोधात जात आहे त्यामुळे कामाला लागा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी नेत्यांना दिला आहे. मुंबईमध्ये आयोजित पक्ष बैठकीत मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.सध्या देशातील वातावरण भाजप विरोधात झाले आहे. तसेच सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याच्या तयारीत असल्याचही त्यांनी सांगितलं आहे. तर दिवाळी पर्यंत कर्ज माफी नाही दिली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मुंबईत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. त्यावेळी झालेल्या भाषणात पवारांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितलं.“जनमत हे सरकारविरोधात चाललं आहे, त्यामुळे आता कामाला लागा,” असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे. त्याच बरोबर “जिथे भाजपची सत्ता आहे तिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. त्यामुळे त्या दृष्टीनेही तयारीला लागा,”असं आवाहन शरद पवारांनी केलं.शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही शरद पवारांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं .पवार यांनी सरकारला दिवाळी पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे . दिवाळी पर्यंत कर्ज माफी नाही दिली तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Loading...

 

Add Comment

Click here to post a comment
Loading…