संतापजनक ! कौमार्य चाचणीला नकार दिल्यानं दांडिया खेळायला विराेध

पिंपरी (पुणे) : कौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्या भाट-तमायचीकर यांना दांडिया खेळण्यास विरोध झाल्याचा प्रकार पिंपरीत घडला. ऐश्वर्या दांडिया खेळायला आल्याने खेळच बंद करण्यात आला. पिंपरीतल्या भाटनगर येथे हा प्रकार घडला.तिचा पती विवेक तामचीकर यानेही पिंपरी येथे घडलेल्या या प्रकाराबाबत फेसबुक पोस्ट लिहून या गोष्टीचा निषेध नोंदवला आहे.

विवेक अाणि एेश्वर्या तमायचीकर यांनी माेठा लढा देत काैमार्य चाचणीला विराेध केला. यामुळे त्यांना त्यांच्या भाट समाजातून माेठ्या राेषाला सामाेरे जावे लागले. मे महिन्यात दाेघांनी पिंपरीत विवाह केला. विवेक अाणि एेश्वर्या यांनी अनिष्ठ रुढीच्या विराेधात लढा दिल्याने त्यांच्या समाज्याकडून त्यांना बहिष्कृत करण्यात अाले अाहे. साेमवारी एेश्वर्या या त्यांच्या माहेरी पिंपरी येथे गेल्या हाेत्या. भाटनगर येथे देवीची अारती झाल्यानंतर दांडिया चा कार्यक्रम सुरु झाला. काहीवेळाने एेश्वर्या अाणि त्यांच्या काही मैत्रिणी यांनी दांडिया खेळण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाच्या अायाेजकांच्या लक्षात ही गाेष्ट अाल्यानंतर दांडिया थांबविण्यात अाला. तसेच एेश्वर्या यांच्या अाईला त्यांना येथून घेऊन जाण्यास सांगण्यात अाले. एेश्वर्या यांच्या ही गाेष्ट लक्षात येताच त्यांनी तेथून जाण्यास नकार दिला. त्यामुळे अायाेजकांनी दांडियाचा कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले. तसेच केवळ मुलांना डिजेवर नाचण्याची परवानगी दिली. एेश्वर्या यांना बहिष्कृत करण्यात अाल्याने त्या पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर पुन्हा दांडियाचा कार्यक्रम सुरु करण्यात अाला.

जानेवारी महिन्यापासून ऐश्वर्या आणि कंजारभाट समाजातील इतर तरूण-तरूणींना कौमार्य चाचणीला विरोध दर्शवला आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर Stop The V Ritual या नावाने ग्रुप तयार करून हे तरूण-तरूणी एकवटलेत. पिंपरीतील कंजारभाट समाजातील गुंडांनी पुन्हा एकदा पुरुषार्थ दाखवून दिला. निषेध! निषेध! निषेध! माझ्या पत्नीने या जात गुंडांच्या कौमार्यपरिक्षणाच्या अमानुष प्रथेविरोधात हिंमतीने लढा दिला म्हणून तिला दांडिया, गरबा खेळण्यास मनाई करून बहिष्काराचं कृत्य करण्यात आलंय, कौमार्य परिक्षण करणाऱ्यांनी नवरात्रीत देवीची पूजा करणे हे निव्वळ ढोंग आहे.” अशी फेसबुक पोस्ट ऐश्वर्याचा पती विवेक तामचीकर याने लिहिली आहे.