किटकनाशक औषध प्राशन महिलेचा प्रांत कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

किटकनाशक औषध प्राशन महिलेचा प्रांत कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न death

मुंबई वडोदरा रस्ते विकास प्रकल्पात बाधित शेतकरी महिलेला दिला जाणारा जागेचा मोबदला तिला न देता दुसऱ्याच व्यक्तिला देण्यात आला असल्याची घटना समर आली आहे. यामुळे महिलेने कल्याण प्रांत कार्यालयात किटकनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या महिलेचे नाव कुसूम सुरोशी असे असून ती  रायता गावातील शेतकरी आहे. तिच्यावर सध्या कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कुसूम यांची मुंबई वडोदरा रस्ते प्रकल्पात जमीन बाधित होत असून त्यांच्या नावावर बाधीत जमीनाचा सातबारा आहे. त्यांना बाधित जमिनीच्या बदल्यात एक कोटी 3 लाख 69 हजार रुपये मोबदला सरकारकडून मिळणो अपेक्षीत होता.

सरकारी कर्मचाऱ्यांना विमा योजना ऐच्छिक – वित्त विभाग

त्यासाठी त्यांनी कल्याणच्या प्रांत कार्यालयात पाठपुरावा सुरु ठेवला होता. मात्र त्यांना दिला जाणारा मोबदला त्यांना न देता दुसऱ्याच व्यक्तिला दिला गेला असे त्यांना  समजले. असे समजताच त्यांनी शुक्रवारी म्हणजेच काल ७ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी कल्याणच्या प्रांत कार्यालयात किटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रांत अधिकारी नितीन महाजन यांच्या समक्ष हा प्रकार घडला.

इंटरनेट जोडणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त

दरम्यान प्रांत अधिकारी महाजन यांचे म्हणणे आहे की, कुसूम यांच्या नावे सातबारा असल्याने त्यांना सरकारी आर्थिक मोदबल्याची नोटीस दिली होती. मात्र ही नोटीस दिल्यावर एका व्यक्तीने मोदबला देण्यास हरकत घेतली. संबंधित जागा विकत घेतल्याचे सांगत ती जागा त्यांची आहे असे म्हणणे मांडले. त्यामुळे या प्रकरणावर 9 वेळा सुनावणी घेण्यात आली. दोघांमध्ये वाद असल्याने सुनावणी सुरू आहे. मात्र कुसूम यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने दुसऱ्यांना देण्यात येणाऱ्या रक्कमेला स्थगिती देण्यात आली आहे.

किटकनाशक औषध प्राशन महिलेचा प्रांत कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न DEATH