‘पिंपरी – चिंचवड’ महानगरपालिकेत विविध पदांसाठी होत आहे भरती लवकर करा अर्ज : जाणून घ्या प्रक्रिया !

पिंपरी - चिंचवड

पिंपरी – चिंचवड – चांगली नोकरी मिळावी हे अनेकांचे स्वप्न असते त्यांच्यासाठी बातमी आली आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड(Pimpri – Chinchwad) महानगरपालिकेत ३८ जागांसाठी भरती(Recruitment for posts) निघाली असून. हंगामी स्वरूपातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेमध्ये हि भरती असेल. महापालिकेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज लवकर करा अंतिंम तारीख हि ४ फेब्रुवारी २०२२ आहे.

पदाचे नाव या शिक्षण पात्रता बघुयात –
१ ) प्राध्यापक(Professor) पदासाठी २ जागा आहे :
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) हि मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम. डी / डी.एन.बी. ( त्वचारोग/ रेडिओलॉजी) विषयाशी संबंधित अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये ४ रिसर्च पेपर्स (प्रथम लेखक अथवा संपर्कक्षम लेखक म्हणून) तसेच परवानगी असलेल्या / स्वीकृत / मान्यताप्राप्त(Accredited) वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान ३ वर्षे अनूभव बेसिक मेडीकल टेक्नॉलॉजी कोर्स NMC मान्यता प्राप्त केंद्रातुन पुर्ण केलेले असावे.
बेसिक बायोमेडीकल रिसर्च कोर्स NMC मान्यता प्राप्त केंद्रातुन पुर्ण केलेले असावे.

२ ) सहयोगी प्राध्यापकसाठी (Assistant Professor) ६ जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) हि मान्यता प्राप्त(Accredited) विद्यापीठाची एम. एस/ डी.एन. बी. (शल्यचिकित्सा/ औषध वैद्यकशास्त्र/ रेडिओलॉजी/ नेत्ररोगचिकित्सा/ शल्यचिकित्सा) ही पदव्युत्तर पदवी अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये २ रीसर्च पेपर्स (प्रथम लेखक अथवा संपर्कक्षम लेखक म्हणून) परवानगी असलेल्या /स्वीकृत/ मान्यताप्राप्त(Accredited) वैद्यकीय महाविद्यालयतील / सस्थेत ४ वर्षासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून.

३ )प्रसूतीपूर्व वैद्यकीय अधिकारी सह व्याख्याता (सहायक प्राध्यापक Assistant Professor ) १ जागा आहे.
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) हि मान्यता प्राप्त(Accredited) विद्यापिठाची MD/MS/DNB (Obst. &Gynae.) ही पदव्युत्तर पदवी असावी एका मान्ता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्षे कनिष्ठ निवासी आणि मान्यता प्राप्त(Accredited) वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात १ वर्ष बरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव असावा.

४ ) सहायक प्राध्यापक(Assistant Professor) २८ जागा आहेत
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) हि मान्यताप्राप्त(Accredited) विद्यापीठातून एमडी / डीएनबी (उरोरोगशास्त्र/ त्वचारोगशास्त्र अस्थिरोगशास्त्र/ एनेस्थेशिया/ प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग/ औषध वैद्यकशास्त्र/ बालरोग) एका मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्ष कनिष्ठ निवासी आणि एक मान्यताप्राप्त(Accredited) वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात एक वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव असावा.

५ ) प्रसूती व बालकल्याण अधिकारी सह व्याख्याता/ सहायक प्राध्यापक(Assistant Professor) १ जागा आहे.
शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) हि मान्यता प्राप्त(Accredited) विद्यापिठाची MD/MS/DNB (Obst. &Gynae.) ही पदव्युत्तर पदवी. तसेच एका मान्ता प्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ३ वर्षे कनिष्ठ निवासी आणि मान्यता प्राप्त(Accredited) वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात १ वर्ष बरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव असावा .

अधिकृत संकेतस्थळ पुढे दिले आहे त्या द्वारे अधिक माहिती घेऊ शकता – www.pcmcindia.gov.in

ऑफलाईन अर्ज पद्धत आहे.

नोकरीचे ठिकाण हे पिंपरी – चिंचवड पुणे येथील

वेतन – १५,६०० ते १,८०,४४३/- एवढे असेल

अंतिम तारीख हि ४ फेब्रुवारी आहे

अर्ज पाठवण्याचा पत्ता हा – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, चाणक्य कार्यालय मध्ये पहिला मजला संत तुकारामनगर पुणे पिन कोड – ४११०१८

महत्वाच्या बातम्या –