शेंदरी बोंडअळीचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी कापसाची लागवड १५ जूननंतरच करा! कृषी विभागाने दिला सल्ला

औरंगाबाद – शेंदरी बोंडअळीचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी १५ जून नंतर आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच कापूस पिकाची लागवड करणे होईल, असा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. तसेच गुलाबी बोंडअळीच्या पिढीचा अन्नपुरवठा खंडित होण्यासाठी पूर्वहंगामी कापसाची लागवड सर्व शेतकऱ्यांनी टाळणे आवश्यक असल्याचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले.

कापूस हे जिल्ह्यातील प्रमूख पिक असुन ठिबक – सुक्ष्म सिंचन सुविधेच्या सहाय्याने बागायती क्षेञातील बहुतांश शेतकरी पुर्व हंगामी कापुस या पिकाची २५ मे ते ७ जून दरम्यान लागवड करतात. २०१७ चा हंगामा मध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. या अळीचा प्रादुर्भाव होण्यामागे अनेक कारणासह पूर्वहंगामी कापसाची लागवड हे एक महत्त्वपूर्ण कारण असल्याचे आढळून आले. पूर्वहंगामी कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यास गुलाबी बोंडअळीचे सुप्तावस्थेतील कोशातून निघालेल्या पतंगांना लवकर अन्न मिळाते तसेच सुरुवातीपासून खायला मिळाल्यामुळे त्याचप्रमाणे पूर्व हंगामी कापसाला फुलोरा येण्याची वेळ व गुलाबी बोंड आळी च्या सुप्त अवस्थेतून निघालेले पतंग यांची अंडी घालण्याची अवस्था यांचा कालावधी जुळल्याने गुलाबी बोंडअळीची पहिली पिढी त्या क्षेत्रात वाढते व पुढे वाढलेली पिढी इतर शेतकऱ्यांच्या शेतावर प्रादुर्भाव करते.

एक जूनपासून कापूस पिकाच्या बियाण्याची विक्री सुरु झाली आहे. मागील दोन ते तीन दिवसांमध्ये जिल्ह्यातील काही भागांमध्य पूर्व मोसमी पाऊस झालेला असून शेतकऱ्यांची लागवडीसाठी लगबग सुरू झालेले आहे . तथापि ते पाऊसमान लागवडीसाठ पुरेसे नसून गडबडीत लागवड करून पुढे एखादा मोठा खंड पडला तरी अडचणी निर्माण होऊ शकतात. कोविड -१९ च्या धर्तीवर गर्दी होऊ नये यासाठी एक जून पासून बियाण्याची विक्री सुरू झाली असली तरी शेतकऱ्यांनी १० ते १५ जून नंतर व १०० मिलिमीटर पाऊस होऊन जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच कापूस पिकाची लागवड करणे योग्य होईल, असे त्यांनी नमूद केले. मागीलवर्षी काही प्रमाणात कापूस पिकावर झालेला शेंदरी बोंडअळीचा प्रार्दूभाव लक्षात घेता पुर्वहंगामी कापूस लागवड टाळावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या –