आज पासून राज्यात प्लास्टिक बंदी !

टिम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक, थर्माकोलबंदी लागू करण्यासाठी  काढलेल्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने पुन्हा एकदा फेटाळून लावली त्यामुळे आज पासून राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी आलेली आहे.पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी प्लास्टिक व थर्मोकोल बंदी आवश्यक असे मत उच्च न्यायालयाने दिले.पुढील सुनावणी 20 जुलै ला होईल.

प्लास्टिक बंदीबाबत आपली बाजू मांडण्यासाठी याचिकाकर्ते उत्पादक, वितरक व व्यापार्‍यांच्या संघटनेला तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करीत मंत्रालयातील शुक्रवारच्या आढावा बैठकीत शनिवार, दि. 23 जूनपासून राज्यात प्लास्टिक व थर्माकोल बंदी लागू करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.