टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. शेतकरी आता तेराव्या हप्त्याची वाट बघत आहे. 13 व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने थोडे कडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर या योजनेचा तेरावा हप्ता हवा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी (E KYC) आणि जमिनीच्या नोंदी करून घ्या. कारण जर शेतकऱ्यांचे ई-केवायसी नसेल, तर शेतकऱ्यांना या योजनेच्या तेरावा हप्त्याच्या लाभ घेता येणार नाही.
पीएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) ई-केवायसी कसे करावे
प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धती फॉलो करावी लागेल. यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईटवर जाऊन फार्मर्स कॉर्नरवरील किसान ई-केवायसी लिंकवर क्लिक करावे लागेल. लिंकवर क्लिक केल्यावर आधार क्रमांक भरण्याचा पर्याय येईल. आधार क्रमांक भरून बाजूला दिलेला कॅपचा कोड प्रविष्ट करा. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो आलेला ओटीपी प्रविष्ट करा. त्यानंतर Submit for Auth या पर्यायावर क्लिक करा. जर सर्व काही बरोबर असेल तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असे समजा.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनाही ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. शेतकरी ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी करू शकतात. फक्त त्यांना यासाठी जवळच्या सीएससी किंवा वसुधा केंद्रामध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या ठिकाणी बायोमेट्रिक प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण केले जाते. त्याचबरोबर या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना पंधरा रुपये शुल्क भरावे लागेल.
पीएम किसान योजनेच्या बारावी हप्त्यापासून जवळजवळ चार कोटी शेतकरी वंचित राहिले आहे. ई-केवायसी नसल्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांचा बारावा हप्ता मिळाला नाही. त्याचबरोबर यामधील काही शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी झाली नव्हती. त्यामुळे देखील त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. म्हणूनच केंद्र सरकारकडून वारंवार ई-केवायसी करून घ्या! असे निवेदन केले जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 16000 कोटींची रक्कम बाराव्या हप्त्याचे स्वरूपात पाठवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant | “गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”; उदय सामंतांच्या दाव्याने ठाकरे गटाची चिंता वाढली
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे आज आमदारांसह गुवाहाटीला रवाना! ठाकरेंना पुन्हा धक्का?
- IND vs NZ | भारताविरुद्ध शतक करत टॉम लॅथमने केला ‘हा’ विक्रम
- Sanjay Raut | “या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीय का?”; संजय राऊतांचा खोचक सवाल
- Uddhav Thackeray | शिंदे गटात गेलेल्या प्रतापवराव जाधवांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा!