PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. आता शेतकरी तेराव्या हप्त्याची वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने थोडे खडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. आगामी अधिवेशनामध्ये 2023-024 वर्षाचा साधारण अर्थसंकल्प येणार आहे. केंद्र सरकार सध्या अर्थसंकल्पाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या नव्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असू शकते. कारण या क्रमवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला फक्त तीन हप्ते पाठवले जात होते. यामध्ये 4 महिन्यामध्ये दोन हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये या हप्त्याच्या रकमेत बदल करू शकते. यावेळी या योजनेतील रक्कम वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही रक्कम सहा हजारावरून आठ हजार रुपये होऊ शकते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ही रक्कम तीन हप्त्यात दिली जात असताना, ही रक्कम आता चार हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना मिळू शकते.
शेतकऱ्यांना जर या योजनेचा तेरावा हप्ता हवा असेल तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी (E KYC) आणि जमिनीच्या नोंदी करून घ्या. कारण जर शेतकऱ्यांचे ई-केवायसी नसेल, तर शेतकऱ्यांना या योजनेच्या तेरावा हप्त्याच्या लाभ घेता येणार नाही.
प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धती फॉलो करावी लागेल. यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाईटवर जाऊन फार्मर्स कॉर्नर वरील किसान ई-केवायसी लिंकवर क्लिक करावे लागेल. लिंक वर क्लिक केल्यावर आधार क्रमांक भरण्याचा पर्याय येईल. आधार क्रमांक भरून बाजूला दिलेला कॅपचा कोड प्रविष्ट करा. त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो आलेला ओटीपी प्रविष्ट करा. त्यानंतर Submit for Auth या पर्यायावर क्लिक करा. जर सर्व काही बरोबर असेल तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असे समजा.
महत्वाच्या बातम्या
- Jaydev Unadakar | जयदेव उनाडकरचे 12 वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन, मिळाले देशांतर्गत क्रिकेट कामगिरीचे बक्षीस
- Weight Loss Tips | हिवाळ्यामध्ये वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे व्यायाम
- Winter Health Care | हिवाळ्यामध्ये तिळाचे तेल खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- IND vs BAN | आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघासमोर मोठे आव्हान, जपावी लागेल आपली प्रतिष्ठा
- Most Sixes in 2022 | आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियातील ‘या’ खेळाडूने लगावले आहेत सर्वाधिक षटकार