टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात. या योजनेचा 12 हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला असून तेरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी देशातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 16000 कोटी रक्कम पाठवली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची 13 वा हप्ता मिळवण्यासाठी कसरत सुरू आहे. शेतकऱ्यांची ही कसरत लवकरच पूर्ण होणार आहे. कारण 17 फेब्रुवारीपर्यंत प्रधानमंत्री किसान योजनाचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहचू शकतो.
या योजनेतील फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणामुळे सरकारने तेराव्या हप्त्यासाठी थोडे कडक नियम केले आहे. यामध्ये सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) आणि जमिनीच्या नोंदणी करून घेणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड देखील लिंक करायला सांगितले आहे. जर तुमचे रेशन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकरी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करू शकतात. यासाठी शेतकरी जवळील कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधून पीएम फॉर्मचा अर्ज भरू शकतात. दरम्यान, या अर्जामध्ये सांगितलेली सगळी माहिती योग्य पद्धतीने भरून योग्य कागदपत्रांची प्रत या सोबत जोडणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर या कागदपत्रांसोबत रेशन कार्ड क्रमांक द्यायला विसरू नका. कारण सरकारने जारी केलेले नव्या नियमानुसार रेशन कार्ड क्रमांक शिवाय तुम्हाला 13 वा हप्ता मिळणार नाही.
प्रधानमंत्री किसान योजनेसाठी तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने स्वतः अर्ज करत असाल तर तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज मध्ये सांगितलेली सगळी माहिती योग्य पद्धतीने प्रविष्ट करावी लागेल. त्याचबरोबर मला यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो, शेतीच्या कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी अपलोड कराव्या लागतील.
महत्वाच्या बातम्या
- Diabetes | डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात ‘या’ भाज्यांचा करा समावेश
- Rupali Patil | “प्रसाद लाड यांची जीभ…”; शिवरायांवरील विधानावरून रुपाली पाटील आक्रमक
- Sambhajiraje Chhatrapati | प्रसाद लाड यांच्या विधानावरून संभाजीराजेंची आक्रमक भूमिका; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले, “जमत नसेल तर…”
- Arvind Sawant | “कोश्यारी ते प्रसाद लाड सगळ्यांना हाकलून द्या”; अरविंद सावंत यांची संतप्त प्रतिक्रिया
- Gulabrao Patil | “मंत्रिपद गेलं खड्ड्यात, शिवरायांचा अवमान केल्यास…”; गुलाबराव पाटील यांचा इशारा काय?