PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातात. या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच या यादीतून 1.86 कोटी शेतकऱ्यांना या बाहेर काढून टाकण्यात आले आहे. कारण या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धती वापरून या योजनेच्या लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने पैसे जमा करणाऱ्या शेतकऱ्यांचे बँक खाते सरकार ब्लॉक करत आहे. त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदीची पडताळणी लवकरात लवकर करून घ्यावी, असे देखील सांगण्यात आले आहे. ही दोन्ही कामं जर पूर्ण नसेल तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा निधी पोहोचणार नाही. अशा कडक सूचना सरकार मार्फत करण्यात आले आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नियमानुसार फक्त दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या लहान शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळेल. त्याचबरोबर या शेतकऱ्यांकडे भारताचे नागरिकत्व असणे बंधनकारक आहे. ही योजना गरीब आणि लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी तयार केलेली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सामील होण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल क्रमांक, ई-केवायसी, रेशन कार्ड आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. शेतकरी या योजनेसंबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या योजनेमध्ये सरकारने पुढील निर्णय घेतले आहे :
- भाडेतत्त्वावर जमीन घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे.
- त्याचबरोबर दोन हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवर शेती करणारे शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
- पीएम किसान योजनेमध्ये सामील झाल्यानंतर जमीन खरेदी करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेसाठी अपात्र मानले जाते.
- आयकर भरणारे शेतकरी ही श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये सामील होतात. त्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
- जर तुमच्याकडे दोन हेक्टर शेती असेल पण तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही आस्थापनेवर नोकरी करत असाल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकत नाही.
महत्वाच्या बातम्या
- Health Care Tips | सकाळी रिकाम्या पोटी मध आणि मनुका खाल्ल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Aaditya Thackeray | भगतसिंह कोश्यारींना भाजपचा छुपा पाठिंबा आहे का? ; आदित्य ठाकरेंचा सवाल
- Upcoming Cars | 2023 मध्ये मारुतीच्या ‘या’ कार लाँच होणार, तर महिंद्रा सादर करणार ‘ही’ SUV
- Aaditya Thackeray | ‘शी….राणेंवर बोलयचा नाही’ ; आदित्य ठाकरेंनी प्रश्न टाळला
- Gunratn Sadavarte | “पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा”; गुणरत्न सदावर्ते यांचा दावा