टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे तेरावे हप्त्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. कारण या योजनेतील फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणामुळे सरकारने तेराव्या हप्त्यासाठी थोडे कडक नियम केले आहे. यामध्ये सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (E-KYC) आणि जमिनीच्या नोंदणी करून घेणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड देखील लिंक करायला सांगितले आहे.
जर तुमचे रेशन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसान योजनेमध्ये रेशन कार्ड लिंक करण्याचा अर्थ आहे की, तुम्ही तुमच्या कुटुंबातील फक्त एका सदस्याला या योजनेचा लाभार्थी बनवत आहे. कारण अलीकडे असे आढळून आले आहे की, एकाच कुटुंबातील पती-पत्नी, वडील-मुलगा, भाऊ-बहीण असे सदस्य पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे आता प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड नोंदणी क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड लिंक करणे आता अनिवार्य झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना रेशन कार्ड नोंदणी क्रमांकासह त्याची सॉफ्ट कॉपी पीडीएफ फाईल देखील अपलोड करावे लागणार आहे. पीएम किसान योजनेमध्ये कागदपत्रांची हाड कॉपी जमा करण्याची सक्ती दूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी आता pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन योजनेसंबंधी कोणतेही काम करू शकतात.
पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील पद्धतीने रेशन कार्ड लिंक करावे
- रेशन कार्ड लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम pmkisan.gov.in या पोर्टलवर जावे लागेल.
- होम पेज उघडल्यानंतर नवीन नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- येथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
- त्यानंतर ओपन झालेल्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
- या माहितीमध्ये तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
- यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित कागदपत्रांसह स्कॅन केलेल्या रेशन कार्डची PDF कॉपी अपलोड करून सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही – संजय राऊत
- IIFA 2023 | अबुधाबीमध्ये पुन्हा एकदा रंगणार आयफा अवॉर्ड सोहळा, ‘हे’ स्टार्स करणार कार्यक्रम होस्ट
- Vikram Kirloskar Death | ‘टोयोटा’ची वेगळी ओळख निर्माण करणारे, विक्रम किर्लोस्कर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन
- Winter Care Tips | सावधान! हिवाळ्यामध्ये स्वेटर घालून झोपत असाल तर होऊ शकतात ‘या’ आरोग्याच्या समस्या
- IND vs NZ | “पंतला आता विश्रांती देण्याची…”; संजू सॅमसनला संघातून वगळल्याने शशी थरूर संतापले