धान खरेदीचे धोरण ठरविण्यासाठी विधीमंडळात चर्चा करणार – नाना पटोले

धान खरेदीचे धोरण ठरविण्यासाठी विधीमंडळात चर्चा करणार - नाना पटोले nana patole

शेतकऱ्यांना धान विकताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अवकाळी पावसात उघड्यावरील धान ओला झाले होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान खरेदीला सुरवात होते आणि त्याच वेळी नियोजन सुद्धा केले जाते. ऐनवेळेवर नियोजन होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच मोठा आर्थिक फटकाही बसतो. हा प्रकार टाळण्यासाठी आपण धान खरेदीचे धोरण ठरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लवकरच विधीमंडळात यावर चर्चा करून शासननिर्णय घेतला जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.

एसटी झाली ७१ वर्षांची; एसटी महामंडळाचा १ जून रोजी वर्धापनदिन

भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर पर्याय म्हणून मुजबी गावापासून कोरंभी देवी मार्गे बायपास काढण्याचा प्रस्ताव आहे. वैनगंगा नदीवर कोरंभीजवळ मोठा पूल उभारला जाईल. वाहतुकीची समस्या तर सुटेल परंतु गोसे प्रकल्पाचे विहंगम दृष्य अनुभवण्यासाठी पर्यटक आकर्षित होतील. बॅक वॉटरचा उपयोग पर्यटनासाठी करण्याचा प्रयत्नही होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

देशात साखरेच्या उत्पादनात घट होणार

धान खरेदीची पूर्व तयारी हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे जून-जुलै महिन्यातच करण्याचा प्रस्ताव आहे. सप्टेंबरमध्ये धान निघतो. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात धानाच्या खरेदीला प्रारंभ होतो. पूर्व तयारीत सुरुवातीला झाल्याने धानाची नासाडी होणार नाही. तसेच भरडाई आणि गोदामांचा प्रश्नही यातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यात गोदामांची संख्या वाढविण्यावरही यात भर दिला जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.