राज्यात आजपासून ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

पावसासह गारपीट

मुंबई –   डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार. पावसाने हजेरी लावली होती यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली होती, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडणार  हवामान (Weather) विभागाने दिली आहे. आज 6 जानेवारी पासून तर ९ जानेवारीपर्यंत  राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी (Untimely) पाऊस पडणार आहे अशी माहित  ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली आहे.  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये  मुसळधार पाऊस (rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तर हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील  उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून म्हणजेच ६ जानेवारीपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार आहे.

हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार आज 6 जानेवारी पासून तर ९ जानेवारीपर्यंत  उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरणसह या भागात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील धुळे,नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी (Untimely) पाऊस पडणार आहे. तर राज्यातील धुळे,नंदुरबार , जळगाव, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ७ जानेवारी रोजी पाऊस पडसणार आहे,

तर राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये 8 जानेवारीला पाऊस पडणार असून यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ९ जानेवारीला पाऊस पडणार असून यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या –