नागपूर : नागपूर जिल्ह्यासह विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यातील धरणं भरली असल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पूर येऊ शकतो. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील मध्यम धरण प्रकल्प जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर, मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये देखील सरासरी ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन केलं आहे. धरणात क्षेत्रात पडणारा पाऊस आणि आजू-बाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याचा आवक्यामुळे पूर परिस्थिती लक्षात घेता, दरवाजे असणाऱ्या मोठ्या धरणाचे वक्र दरवाजे कधीही उघडण्यात येवू शकतात. तर दरवाजे नसणाऱ्या धरणातील पाणीसाठा 100 टक्के पेक्षा जास्त झाल्यावर नदी/ नाल्यातुन पुराचे पाणी वाहणार आहे.
त्यामुळे करीता नदी काठावरील सर्व नागरिकांनी/ शेतकऱ्यांनी शेतात लागणारे यंत्र (अवजारे) तसंच जनावरे यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करून ठेवावी. तसेच नदीच्या काठावरील गावातील नागरिकांना आणि नदी पात्रातून आवागमण करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वत:ची काळजी बाळगावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – दत्तात्रय भरणे
- हरभरा लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु – वर्षा गायकवाड