पुणे – जिल्हा परिषदेत १३,५२१ जागांसाठी भरती(Recruitment) होणार का ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे माघील फडणवीस सरकारच्या(Fadnavis Government) काळात सरकारी विभागातील रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. या भरतीची प्रक्रिया हि सुरु होती २०१९ मार्च दरम्यान जिल्हा परिषदेच्या जागांसाठी तब्ब्ल राज्यातून २० लाखांच्यावर अर्ज आले होते. विद्यार्थ्यांनी २ ते ३ हजार रुपये देऊन वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केले परंतु तांत्रिक अडचणी मूळ हि भरती रखडली गेली, त्यांनतर जगभरात कोरोना महामारीचे संकट उभे राहिले संपूर्ण जग थांबले असता, सर्व व्यवहार सरकारी कामे तसेच भरतीवर हि निर्बंध होते मात्र महाविकास आघाडी सरकारने निर्बंध उठवले असून विविध जागेचे रिक्त पदे भरण्यास सुरवात झाली आहे(Vacancies are being filled),
महापरीक्षा संकेतस्थळ(Website) बंद करण्यात आल्याने सरकारनी जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षेसाठी चार खासगी कंपनी निवडल्या मात्र त्यातील न्यासा कंपनी द्वारे निविदा पूर्ण करण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा न्यासा कंपनी चा करार रद्द केला गेला त्यामुळे तीन मधील एका कंपनीला निवडून परीक्षा प्रक्रिया पूर्ण करा अश्या सूचना ठाकरे सरकारने ग्रामविकास व पंचायत राज विभागला(Rural Development and Panchayat Raj divided) केल्या आहे.
फडणवीस सरकारच्या काळात ३ मार्च २०१९ रोजी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पदांची संख्या १३५२१ असून जिल्हानिहाय रिक्त जागेची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे – अकोला २४२, अमरावती ४६३, अहमदनगर ७२९, बीड ४५६, भंडारा १४२, औरंगाबाद ३६२, गडचिरोली ३३५,गोंदिया २५७, चंद्रपूर ३२३, लातूर २८६, नाशिक ६८७, हिंगोली १५०, पालघर ७०८, नंदुरबार ३३३, परभणी २५९, नागपूर ४१८,सातारा ७०८, रायगड ५१०, वाशीम १८२, बुलढाणा ३३२, पुणे ५९५, उस्मानाबाद ३२०, जालना ३२८, यवतमाळ ५०५, रत्नागिरी ४६६, नांदेड ५५७, ठाणे १९६, वर्धा २६७, धुळे २१९, सिंधुदुर्ग १६२, कोल्हापूर ५३२, जळगाव ६०७, सोलापूर ४१४, सांगली ४७१
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – राज्यात विविध सरकारी विभागात २ कोटी ४४ लाख पद रिक्त ;
- शेतकऱ्यांच्या संकटात आणखी एक वाढ ; ‘ह्या’ पिकाचे नुकसान होणार ?
- आंघोळ करताना ‘कोमट’ पाण्यात टाका मीठ ; जाणून घ्या फायदा !
- पेट्रोल – डिझेल चे नवे दर जारी ; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव !
- ‘पुणे – मुंबई’ या दोन शहरांना वाढला कोरोनाचा धोका ; मास्क वापरा – मुख्यमं