भारतातील ‘या’ भागांमध्ये आजपासून पुढचे २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

विजांच्या कडकडाटासह

नवी दिल्ली –  दक्षिण भारताकडील आंध्र प्रदेश, तामीळनाडू आणि कर्नाटकात  या राज्यांमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे . मागील काही वर्षांपासून चांगलाच पाऊस पडत आहे, तर आता या भागांमध्ये भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढी ३ दिवस पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण मध्य बंगालच्या खाडीवर चक्रीय स्थितीचे क्षेत्र तयार झाले आहे. तर आजपासून म्हणजेच २६ नोव्हेंबर पासून ते २८ नोव्हेंबरपर्यंत  तामीळनाडूचा उत्तर भाग, चेन्नई, कवाली, नेल्लोर, तिरुपतीसह आंध्र प्रदेश या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतातील  तामीळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर मन्नार खाडीसह दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या खाडीत आज २६ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत जोरदार वारे वाहतील. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिलेली आहे.

महत्वाच्या बातम्या –