कोंबड्या मागील आठ दिवसांपासून अंडी देत नसल्यामुळे पोल्ट्री चालकाची पोलिसांत तक्रार

कोंबड्या मागील आठ दिवसांपासून अंडी देत नसल्यामुळे पोल्ट्री चालकाची पोलिसांत तक्रार gharguti kombdya

पुणे – सहसा नुकसान झाल्यास, न्याय मिळवण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेतात. पण काही प्रकरणे असे असतात की पोलिसांनाही त्या तक्रारीवर रडावे की हसावे असे समजत नाही. मागे विहिर चोरीला गेल्याची घटना राज्यभरात अशीच गाजली होती. त्यानंतर अनेक दिवसांनंतर पोलिसांकडे एक अनोखी तक्रार आली आहे. एका व्यक्तीने कोंबड्या अंडी देत नाहीत अशी तक्रार पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीमुळे पोलिसही काही काळ कोड्यात पडले होते.

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथे पोल्ट्री फार्म आहे. या पोल्ट्रीमधील कोंबड्यांनी मागील आठ दिवसांपासून अंडी देणं बंद केलंय. यामुळे तेथील पोल्ट्री चालकांचे लाखोंचे नुकसान होतेय. त्याचे झाले असे की, म्हातोबाची आळंदी परिसरातील लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री चालक आहेत. त्यांनी ११ एप्रिल रोजी एका कंपनीचे कोंबड्यासाठी असलेलं खाद्य खरेदी केले होते.

ते खाद्य त्यांनी कोंबड्यांना दररोज दिले. पण खाद्य सुरू केल्यापासून कोंबड्यांचं अंडी देणंच बंद झालं. यामुळे पोल्ट्री चालकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्याने सुरू केलेल्या खाद्यामुळे अंडी देणं बंद झालं असल्याचं प्राथमिक तपासणीत आढळले.

यानंतर पोल्ट्री चालकाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आपली कैफियत मांडली. लोणी काळभोर पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबधित कंपनीवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या तक्रारीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या –