प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 चे पिकाची नुकसान भरपाई वाटप होणार

बीड : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये बीड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई मार्फत राबविण्यात आली होती. यामध्ये बीड जिल्ह्यातून 21.62 लाख अर्जदार शेतकऱ्यांनी 7.64 लाख क्षेत्राचे पीकसंरक्षित करून 7422.54 लाख विमा हफ्ता भरलेला होता.विमा कंपनीकडून अधिसूचित असलेल्या पिकांपैकी तुर, कापूस व कांदा या पिकाची नुकसान भरपाई येत्या काही दिवसात मंजूर होऊन वाटपाचे काम सुरू होणार आहे.

आयएएस ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

खरीप, ज्वारी , बाजरी व सोयाबीन या अधिसूचित असलेल्या सर्वच महसूल मंडळात नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मंजूर झालेली आहे. सहभागी शेतकऱ्यांपैकी 1231864 शेतकऱ्यांना 59905.76 लाख नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मंजूर होऊन वाटपाचे काम झाले आहे.

पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी – शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे

ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेल्या पिकांना अद्याप पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर गठीत तक्रार निवारण समितीकडे तक्रार अर्ज विमा भरलेल्या पावतीची छायाकंन प्रतीसह तालुका कृषी कार्यालयात उपस्थितीत भारतीय कृषी विमा कंपनी यांचे प्रतिनिधी यांचेकडे लेखी अर्ज करावा असे आवाहन राजेंद्र निकम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड यांनी केले आहे.

पीक कापणी प्रयोगातल्या त्रुटींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई – सहकार मंत्री

महत्वाच्या बातम्या –

रब्बी हंगामात दहा जिल्ह्यांतील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता

पीकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेवराईमध्ये एक तास रास्ता रोको आंदोलन