भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचा मेळावा प्रकाश आंबेडकरही घेणार

बीड – कोरोनाने जगभरात थैमान घातले असून याचा मोठा परिणाम भारतात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विजयादशमीच्या निमित्ताने राजकीय जुगलबंदी दरवर्षी पाहायला मिळते मात्र यंदा काहीसं वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज विजयादशमीच्या मुहुर्तावर आज सावरगाव घाट येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत आहे. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन होत आहे. भगवानगडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला . या दसऱ्या मेळाव्याला पहिल्यांदाच खासदार प्रीतम मुंडे अनुपस्थित राहणार आहेत. त्यांची प्रकृती खराब असल्याने त्या या मेळाव्याला हजर राहू शकलेल्या नाहीत tv9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या 25 फुटी मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली आहे. भगवानबाबांच्या स्मृतिस्थळ परिसरात पंकजा मुंडे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, यावर्षी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला प्रकाश आंबेडकर संबोधित करणार आहेत. भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन प्रकाश आंबेडकर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासमोर आव्हान उभं केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –