fbpx

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देणार – प्रतापराव जाधव

प्रतापराव जाधव

अतिवृष्टीने बुलडाणा तालुक्यातील कोलवड, तांदुळवाडी, हतेडी, अंभोरा शिवारात प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. त्यासोबतच प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संतोष शिंदे, तालुका कृषी अधिकारी चोपडे, नायब तहसीलदार अमरसिंग पवार, मंडळ भिकारी राऊत, तलाठी सावळे, राजपूत उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेत जमिनी खरडून गेल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन खा. प्रतापराव जाधव यांनी ३० जून रोजी दिले.

अतिवृष्टीने विहीर व शेतीचे झालेले नुकसान याबद्दल अधिकाऱ्यांनी अडवणुकीचे धोरण न ठेवता सहकार्याच्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या संकटात त्यांना साथ देण्याचे आवाहन जाधव यांनी केले. तांदुळवाडी मध्ये जवळपास ६० हुन अधिक घरामध्ये पाणी घुसून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी  झालेल्या नुकसानाचा तात्काळ सर्वे करावा, अशा सूचनाही जाधव यांनी दिल्या.

महत्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरे यांना आत्ताच शेतकऱ्यांचा पुळका कसा आला – राजू शेट्टी

शेतकऱ्यांना आता थेट गोदामांतून करता येणार आपल्या मालाची देशभर कोठेही विक्री

Add Comment

Click here to post a comment