नागपूरसह विदर्भात पावसाने लावली हजेरी

ऐन हिवाळ्यात नागपूरसह विदर्भातील वर्धा, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागांना गुरुवारी अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे जनसामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सकाळपासूनच नागपूर जिल्ह्यात वादळासह पाऊस सुरू झाला.

बजेटच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव घसरले…

नागपूर जिल्ह्याला गुरुवारी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. काही भागात जोरदार गारपीट झाली. यामुळे मोहपा (ता. कळमेश्वर) परिसरातील शेतशिवारात चक्क बर्फाची नाली तयार झाली होती. बऱ्याच ठिकाणी गारपीटही झाली. बोचºया थंडीमुळेही लोक हैराण झाले. पावसामुळे नागपूरच्या अनेक भागांत पाणी साचले. गारपीट आणि वादळ व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील संत्रा, मोसंबीसह खरीप व रब्बी तसेच भाजीपाल्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

10 वर्षात हे 10 Apps झाले सर्वाधिक डाऊनलोड

नागपूर जिल्ह्याच्या नरखेड, काटोल, कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील काही भागांमध्ये गारपीट झाली. हिंगणा, कामठी, नागपूर (ग्रामीण), पारशिवनी, रामटेक, मौदा, कुही, उमरेड व भिवापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे झाडांना असलेला कापूस भिजला असून, गहू जमीनदोस्त झाला आहे. शिवाय, तुरी, हरभरा आणि भाजीपाल्याच्या विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.