उपराजधानीती तूर आणि हरभऱ्याच्या भावात घसरण

कडधान्य पिकाची स्थिती एका आठवड्यात स्पष्ट होणार असून त्यातच तूर आणि हरभऱ्याचे भाव पीक चांगले येण्याच्या अंदाजामुळे बाजारात येण्यापूर्वीच घसरले आहेत. १५ दिवसांत तूर डाळ क्विंटलमागे एक हजार आणि हरभरा डाळीचे भाव ६०० रुपयांनी कमी झाले आहेत. भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

खाद्य तेलाच्या किंमतीत वाढ

अडतिया रमेश उमाठे यांनी सांगितले की, तसे पाहता यावर्षी तूर आणि हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढणार नाहीत, पण बाजारात नवीन माल येण्याच्या वृत्ताने पूर्वीच भाव कमी झाले आहेत. १५ दिवसानंतर बाजारात मालाच्या आवकीचे प्रमाण पाहता भाव पुन्हा उंचावण्याची शक्यता आहे. यावर्षी उडद आणि मुगाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मूग ठोकमध्ये प्रति क्विंटल ९० ते १०० रुपये आणि मूग मोगर ९८ ते १०७ रुपयांवर पोहोचले आहेत. उडद मोगरचे भाव गेल्या वर्षी १३५ रुपयांवर पोहोचले होते. याशिवाय वाटाणा डाळीचे भाव कमी होऊन ठोकमध्ये प्रति क्विंटल ४ हजारांवर स्थिरावले आहेत. मोट प्रति किलो ६५ ते ८० रुपये आणि काबुली चणा ६५ ते ९० रुपये भाव आहेत.