पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांशी समस्यांवर थेट संवाद साधावा

नरेंद्र मोदी

पंजाब – मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर झाल्यापासून काँग्रेसने या कायद्यास जोरदार विरोध केला होता. तर, याच कृषी कायद्यांवरून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर – बादल यांनी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून तडकाफडकी राजीनामा दिला होता.

शिरोमणी अकाली दल या सुखबीरसिंग बादल यांच्या पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या युतीला देखील राम–राम ठोकला आहे. अकाली दल आणि भाजप यांची जवळपास २२–२३ वर्षांपासून युती होती. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ काही महिन्यातच एनडीएमधील भाजपच्या जुन्या मित्रपक्षाने साथ सोडल्याने धक्का बसला आहे.

दरम्यान, ‘नव्या कृषी कायद्याला विरोध असणाऱ्या शेतकरी संघटनांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधायला हवा. त्यांच्या समस्या ऐकून त्यावर सर्वमान्य तोडगा काढला जावा, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी केली आहे. मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) व्यवस्था संपुष्टात येईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

या पार्श्वभूमीवर देशभरात काँग्रेसने जोरदार आंदोलन सुरु केलं आहे. तर, बादल यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, लहान शेतकरी त्यांचा शेतमाल दूरवर नेऊ शकत नाही. ते अनेक महिने शेतमाल साठवूही शकत नाही. त्यामुळे शेतमालाच्या किमतीबाबत ते खासगी कंपन्यांशी घासाघीस करु शकणार नाहीत, असं मत व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या