पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचा आवाज ऐकावाच लागेल, शेतकऱ्यांनी मागे हटू नये – राहुल गांधी

राहुल गांधी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील अन्नदाता गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी बसला आहे. या आंदोलनाची धग देशभरात पोहचत असताना प्रजासत्ताक दिनी झालेल्या गोंधळानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत आहे.

काल, शेतकरी आंदोलनातून दोन संघटनांनी आपलं समर्थन काढून आंदोलनातून माघार घेतली. मात्र, कृषी कायद्यांना विरोध त्यांनी कायम ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं सांगत मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवावं असं आवाहन देखील केलं आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचा आवाज ऐकावाच लागेल. अन्यथा हे आंदोलन इतर भागात देखील पसरेल. रोष वाढेल’ असा इशारा दिला आहे. ‘शेतकऱ्यांनी आंदोलनातून मागे हटू नये. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी ठाम राहावं. शेतकरी हे त्यांच्या भवितव्यासाठी लढा देत आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,’ असा विश्वास देखील राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –