वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज उच्चस्तरीय बैठक

मोदी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीचे संकट अधिक गडद झालेय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. यामुळे त्यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. पंतप्रधानांनीच गुरुवारी या उच्चस्तरीय बैठकीबद्दल माहिती दिली.

भाजपने दिलेल्या माहितीनुसार मोदी शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता डिजिटल पद्धतीने एकाच वेळी ठिकाणच्या प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. शुक्रवारनंतर बंगालमध्ये मोदींची कोणतीही सभा नाही. तत्पूर्वी गुरुवारी मोदींनी देशातील ऑक्सिजनच्या उपलब्धती आणि पुरवठ्याच्या मुद्यावर एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याच्या पर्यायांवर चर्चा करत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधानांनी ऑक्सिजनची साठवणूक करणाऱ्या राज्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले.

बैठकीत अधिकाऱ्यांनी गेल्या काही आठवड्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा गरजेनुसार पुरवठा करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पंतप्रधानांना माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २० राज्यांकडून दरदिवशी ६७८५ मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी होत असून २१ एप्रिलपासून त्यांना दरदिवशी ६८२२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या उपलब्धतेत दिवसाकाठी ३३०० मेट्रिक टन वाढ करण्यात आली आहे. मोजके उद्योग वगळता उर्वरित सर्व उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीत कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, गृहसचिव, आरोग्य आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –