दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रीतम मुंडे धावल्या ; केंद्र सरकारकडे मागितली मदत

प्रीतम मुंडे

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीतून जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी प्रीतम मुंडे यांनी केली. प्रीतम मुंडे लोकसभेत बोलत होत्या.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यातही दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीतून जात आहे. याचदरम्यान खासदार प्रीतम मुंडे यांनी महाराष्ट्र सध्या दुष्काळाला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीतून चालला आहे. या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

Loading...

याचबरोबर मराठवाड्यात आणि आणि प्रामुख्याने बीड जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि यातच पावसाअभावी शेतकरी दुष्काळाने होरपळून निघत आहे, त्याला मदतीची गरज आहे, असेही त्यांनी म्हंटले.

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणाच्या निकालावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद

कांदा उत्पादकांसाठी धावले सुजय विखे ; लोकसभेत केली ‘ही’ मागणी

Add Comment

Click here to post a comment
Loading…