मराठमोळ्या ‘पृथ्वी’चा डंका वाजला ; पदार्पणातच ठोकलं शतक

टीम महाराष्ट्र देशा : देशांतर्गत क्रिकेट सामन्यात आपल्या दमदार खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मराठमोळ्या पृथ्वी शॉने आपल्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे.

पृथ्वीने अवघ्या ९८ चेंडूत १०१ धावा ठोकून कसोटी सामन्यातील आपली निवड सार्थ असल्याचं दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे पदार्पणातचं त्याने अनेक विक्रमही रचले आहेत.

पृथ्वी शॉ हा कमी वयात पदार्पणात शतक करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. त्याने हा पराक्रम 18 वर्षे 329 दिवसांत केला आहे. तर बांगलादेशचा मोहम्मद अश्रफुल ( 17 वर्ष व 61 दिवस), झिम्बाब्वेचा हॅमिल्टन मासाकाड्जा ( 17 वर्ष व 352 दिवस) आणि पाकिस्तानचा सलीम मलिक ( 18 वर्ष व 323 दिवस) हे पदार्पणात शतक झळकावणारे युवा फलंदाज आहेत.