उदगिरात प्राध्यापकांचे आंदोलन, विद्यार्थ्यांनी दिला पाठिंबा

दगीर/ प्रतिनिधी : प्राध्यापकांचे रिक्त पदे तात्काळ भरावीत व संपकलीन प्राध्यापकांचे वेतन द्यावे व जुनी पेंशन योजना लागू करावी आशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे गेल्या दहा दिवसापासून प्राध्यापकांचे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच नुकसान न करता मागण्या मान्य होई पर्यंत आंदोलन सुरू असल्याचं स्वामुक्टा प्राध्यापक संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

शहरातील विविध महाविद्यालयातील सुमारे ३० ते ३५ प्राध्यापक गेल्या दहा दिवसापासून बेमुदत आंदोलन करत आहेत. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात सामूहिक रजा आंदोलन तसेच जेल भरो आंदोलन करण्यात आले. राज्यभर विविध मार्गने आंदोलन सुरू आहेत. राज्यातील प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरावेत व संपकलीन प्राध्यापकांचे प्रलंबीत वेतन अदा करणे आणि २००५ नंतर नियुक्त प्रधायपकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच विना अनुदानित शिक्षण पद्दती बंद करणे, तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढविणे आणि सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावे अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी प्राध्यापकांनी काळया फिती लावून सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला या आंदोलनास विद्यार्थ्यांनी पाठींबा दिला आहे.

सरकारचे धोरण हे दुप्पटी भूमिकेचे असुन विनाअनुदानित तत्व तसेच शिक्षणातील खाजगीकरण यामुळे शिक्षणक्षेत्रात संपवण्याचा डाव आहे की काय? असा ही प्रश्न संघटनेकडून व्यक्त केला जात आहे. वेळोवेळी होणारे मोर्चे तसेच आंदोलने यामुळे विद्यार्थ्यांचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसान राज्य सरकार जबाबदार असल्याचे समाजमानातून बोललं जातं आहे. त्यामुळे सरकारने प्राध्यापकांचा संप लवकरात लवकर मिटवावा अशी मागणी होत आहे. यावेळी शहरातील शिवाजी महाविद्यालय, श्री हवगीस्वामी महाविद्यालय, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती.