मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव ! आता महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता ?

सोमवारपासून शाळा सुरु होत आहेत.तसेच राज्यातली महाविद्यालयेही सुरु होण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना महाविद्यालये सुरु करण्या बाबद प्रस्ताव पाठवला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना महाविद्यालये(Colleges) सुरु करण्या बाबद प्रस्ताव पाठवला आहे(Proposal sent) अशी माहिती उदय सामंत यांनी ट्विट करुन दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता(Recognition) दिल्यानंतरच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणले.

सोमवार दिनांक २४ रोजी शाळा सुरु होणार आहे. मात्र 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु(Vaccination of all started) असतानाही महाविद्यालयं सुरु करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शाळा सुरु होत असताना महाविद्यालयं कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे .

तसेच 15 फेबुवारीपर्यंत होणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यावर उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग ठाम असल्याचं सामंत यांनी सांगितलंय.

अन्यथा आंदोलन करू…

शाळा महाविद्यालये बंद ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटण्यासारखे आहे. शासनाने तत्काळ शाळा महाविद्यालये 26 जानेवारी पर्यंत सुरू करावीत अथवा भाजप कार्यकर्ते शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा संतोष शेट्टी यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –