‘ऊसतोड कामगारांसाठी फिरते स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या’

डॉ. नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत, असे निर्देश दिले आहेत. डॉ. नीलम गोऱ्हे पुण्यात बोलत होत्या.

आज ( ९ जुलै ) पुण्यातील कौन्सिल हॉल सभागृहात गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सविस्तर सूचना देताना राज्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. कारखान्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत अथवा नाहीत याची माहिती कामगार विभागाने घ्यावी व ज्या ठिकाणी स्वछतागृहे नाहीत अशा ठिकाणी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश दिले.

Loading...

इतकेच नव्हे तर आरोग्य विषयक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी नियमितपणे आरोग्य, कामगार विभाग व साखर आयुक्तालयाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले.  याचबरोबर ऊसतोड कामगारांना कोयता पध्दतीने वेतन न देता समान पद्धतीने वेतन देण्यात यावे. कामगारांना आरोग्य विषयक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कारखान्याच्या परिसरात फिरते हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

तसेच ऊसतोड कामगार महिलामध्ये गर्भाशय काढून टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. या बाबत चिंता व्यक्त करून महिला कामगारांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ऊसतोड महिला कामगारांच्या विविध समस्या जाऊन घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे हे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी व हे सर्वेक्षण 30 जुलै 2019 पूर्वी अहवाल सादर करावा, असेही गोऱ्हे यांनी म्हंटले.

महत्वाच्या बातम्या –

रेशन कार्डधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन उपलब्ध होणार- जयकुमार रावल

Loading...

पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँका, बोगस बियाणे उत्पादकांवर कठोर कारवाई – रामदास कदम

आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला प्रमाणपत्र द्यावे – डॉ. नीलम गोऱ्हे

Add Comment

Click here to post a comment
Loading…