शेतकऱ्यांना ‘बियाणे’ चांगल्या दर्जेचे पुरवा तुम्ही सुद्धा एक शेतकरीच आहात – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे

          सध्या राज्यात शेकऱ्यांची बियाणे व खतांच्या बाबतीत मोठी फसवणूक होत असून अनेक शेतकऱ्यांच्या त्यामुळे मोठे नुकसान होत असते. आधीच वेळेवर पाऊस नसणे,अतिवृष्टी अश्या अनेक संकटांवर शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे(Health Minister Rajesh Tope) यांनी याबाबतीत लक्ष दिले असून हा विषय गंभीर असून ते म्हणाले कि, ‘बियाणांच्या बाबती मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे आमच्या निर्दशनास येत आहे. मी सर्व दुकानदारांना विनंती व आवाहन करतो कि शेतकऱ्यांना बियाणे व खत विकत असताना योग्य कंपनीचे द्यावे. बळीराजा हा तुम्हा दुकानदारांवर मोठ्या विश्वासाने खते – बियाणे विकत घेत असतो, तुटपुंज्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा आपल्यावरील असेलेला विश्वास तुम्ही तोडू नये. विश्वास उडाला कि तो परत मिळतं नाही. असे ते म्हणाले.

तुम्ही दिलेल्या बियाणांवर शेतकरी हा वर्षभर पिकांची वाट बघत असतो, आणि जर बियाणे खराब दर्जाचे निघाले तर पिकांचे नुकसान होते आणि संपूर्ण वर्ष शेतकऱ्यांचे वाया जाते. आणि बियांना केलेला खर्च न आलेले उत्पादन यामुळे शेतकरी डबघाईस येतो कर्जबाजारी होतो आणि टोकाचा निर्णय घेतो. असे होऊ नये म्हणून माझी सर्व दुकानदारांना पुन्हा एकदा विनंती आणि आवाहन आहे कि शेतकऱ्यांना चांगले व दर्जेदार बियाणेंदेण्यात यावे व त्यांना सुचवावे तुम्ही सुद्धा एक शेतकरीच आहात बळीराजा जगला तर आपण जगू असे भावनिक आवाहन सुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे(Health Minister Rajesh Tope) यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –